रशिया आक्रमक- युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता

मॉस्को: युक्रेन रशिया वादात रशिया आक्रमक झालेला दिसत आहेत. त्यामुळे यु्द्धाचे वारे वेगाने वाहताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून, युक्रेनमधील दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून, यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
लुहान्स आणि डोनेत्स्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून, त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व युक्रेनमधील रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावादी भागांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्यासाठी व्लादिमिर पुतीन यांनी सोमवारी उच्चपदस्थ अधिकाºयांना पाचारण केले होते. आपल्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी आणि युक्रेनच्या कथित लष्करी आक्रमणाविरुद्ध संरक्षणासाठी लष्करी मदतीची तरतूद करणाºया मैत्रीच्या करारांवर स्वाक्षºया कराव्या, अशी विनंती फुटीरतावादी नेत्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर पुतीन यांना केली होती. दरम्यान रशियाने जनतेला संबोधित करताना युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. पुतीन यांनी जनतेला संबोधित करताना युक्रेन हा रशियाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, असे सांगितले, तसेच पूर्व युक्रेन ही प्राचीन रशियन भूमी आहे, असेही म्हटले. रशियाची जनता आपल्या निर्णयाचे स्वागत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉनेत्स्क आणि लुहान्समधील नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासंबंधीचा हा निर्णय फार पूर्वीच घेतला जाणे आवश्यक होता, असेही यावेळी ते म्हणाले. पुतीन यांच्या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी प्रतिक्रिया दिली असून, आपल्याला कोणतीही भीती नसून, पाश्चिमात्य देश आपल्याला पूर्ण पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
अमेरिकेसह जगभरातून निषेध
रशियाच्या या निर्णयावर युरोपीय संघ, नाटो यांच्यासहित अमेरिका आणि इतर देशांनी टीका केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फ्रान्स आणि जर्मनीच्या प्रमुखांशी चर्चा केली असून, रशियाच्या निर्णयावर उत्तर दिले पाहिजे, यावर एकमत झाले आहे. जो बायडन यांनीदेखील एका आदेशावर स्वाक्षरी केली असून, यामध्ये युक्रेनच्या डीपीआर आणि एलपीआर क्षेत्रांमध्ये अमेरिकन नागरिकांच्या गुंतवणूक आणि व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनने रशियावर प्रतिबंध लावण्यासंबंधी म्हटले आहे. रशियाने घेतलेला निर्णय आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. नाटोनेही रशियाच्या निर्णयावर टीका केली असून, या निर्णयामुळे युक्रेनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता दुबळी होईल, तसेच तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसेल, असे सांगितले आहे. भारतानेही या वादावर प्रतिक्रिया देताना दोन्ही बाजूंनी संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला खात्री आहे की, हा प्रश्न केवळ राजनैतिक संवादातूनच सोडवला जाऊ शकतो, असेही भारताने म्हटले आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …