रशियन उद्योगपती व्लादिमीर पोतानिन यांच्याकडे पत्नीने मागितले ५४०० कोटी!

मॉस्को – रशियाचे उद्योगपती व्लादिमीर पोतानिन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या पत्नीने घटस्फोटाच्या पोटगीसाठी लंडनच्या एका न्यायालयात अर्ज केला आहे. नतालिया पोतानिन आणि व्लादिमीर पोतानिन यांचा घटस्फोट झाला आहे. व्लादिमीर पोतानिन यांच्या मालकीच्या कंपनीचा ५० टक्के हिस्सा आपल्याला मिळावा, अशी मागणी नतालिया यांनी केली आहे. व्लादिमीर पोतानिन यांच्या मालकीच्या असलेल्या एमएमसी नोरिल्स्कनिकेल पीजेएससी या कंपनीची किंमत तब्बल १४ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास दहा हजार आठशे कोटी रुपये आहे. यातील अर्धा हिस्सा म्हणजे जवळपास ५४०० कोटी रुपयांची मागणी नतालिया यांनी केली आहे.
नतालिया यांच्या बाजूने हा निकाल लागल्यास हा जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट होऊ शकतो. यापूर्वी अ­ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचादेखील घटस्फोट झाला आहे. जेफ बेझोस यांनी आपल्या पत्नीला घटस्फोटानंतर तब्बल २.७५ लाख कोटी रुपये दिले होते. हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट मानण्यात येतो. त्यानंतर नंबर लागतो तो बिल गेट्स यांचा. गेट्स यांनीदेखील आपल्या पत्नीला कोट्यवधी रुपये दिले होते आणि आता व्लादिमीर पोतानिन यांच्या पत्नीच्या बाजूने निकाल लागल्यास, पोतानिन यांना तब्बल ५४०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच हा जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यानंतर जगातील हा तिसरा सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे.
व्लादिमीर पोतानिन हे रशियाचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. रशिया आर्थिक संकटात सापडलेला असताना देशाला संकटातून बाहेर काढण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना रशियाचे उपपंतप्रधान बनवण्यात आले होते. पोतानिन यांचा जगातील काही निवडक श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश होतो. त्यांचा जागतिक श्रीमंतांच्या क्रमवारीमध्ये ५५ वा क्रमांक लागतो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …