ठळक बातम्या

रवी शास्त्री दिसणार नव्या भूमिकेत

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकानंतर शास्त्री राजीनामा देणार होते. दरम्यान, आता ही स्पर्धा संपली असून पुढील स्पर्धांसाठी भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड काम पाहणार आहे. दरम्यान, आता रवी शास्त्री काय करणार आहेत? असे प्रश्न मागील दिवसांपासून समोर येत होते मात्र याचे उत्तर आता समोर आले आहे. शास्त्री हे लेजेंड्स लीग क्रिकेट या जागतिक क्रिकेट लीगचे आयुक्त अर्थात कमिशनर म्हणून काम पाहणार आहेत.
लेजेंड्स लीगमध्ये जगातील माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर आमने-सामने येऊन खेळताना दिसणार आहे. आता या लीगचा कर्ता-धर्ता म्हणून शास्त्रींवर मुख्य जबाबदारी पडणार असल्याचे संबंधित लीगतर्फे सांगण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, पुन्हा एकदा क्रिकेट या खेळाबरोबर जोडण्याची संधी मिळत आहे, तेही दिग्गज खेळाडूंसोबत ही एक भारी गोष्ट आहे. हे सर्व करताना मजा येणार हेही नक्की. दिग्गज खेळाडू त्यांच्या या सेकंट इनिंगला कसा न्याय देणार हे पाहताना मजा येईल. मी या सर्वांचा एक भाग असल्याने आनंदी आहे. लेजेंड्स लीग क्रिकेटचे पहिले पर्व जानेवारी, २०२२ मध्ये गल्फ देशांमध्ये पार पडणार आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड अशा काही महत्त्वाच्या देशांचे माजी दिग्गज खेळाडू ३ वेगवेगळ्या संघांमध्ये वाटलेले असतील. त्यानुसार हे सामने पार पडणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …