ठळक बातम्या

रविकांत तुपकरांचेअन्नत्याग आंदोलन सुरू : प्रकृती बिघडली


* पोलिसांनी नागपुरातून बुलडाण्यात सोडले
नागपूर – कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी रात्री साडे दहाच्या सुमारास ही अटक केली. अटक केलेल्या तुपकरांना रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडेरवाना करण्यात आलं आहे. नागपुरातील तुपकरांच्या आंदोलनात ‘हाय होल्टेज’ नाट्य रंगल्याचेपाहायला मिळाले. या आंदोलनामुळे त्यांची प्रकृत्ती खालावली असल्यानेपोलिसांनी तुपकर यांना आंदोलन मागेघेण्याची विनंती केली होती, पण जोपर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, अशी भूमिका तुपकरांनी घेत आंदोलन सुरू ठेवलेआहे.
कापूस-सोयाबीन प्रश्नावर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होतय. सरकारने कोरोना आणि जमावबंदीचं कारण देत तुपकरांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. आंदोलनादरम्यान काल रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी तुपकरांना अटक करण्यात आली. प्रकृती खालावलेल्या तुपकरांना जबरदस्तीनेउपचारांसाठी नागपुरात दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारास स्पष्ट नकार देत आपलंअन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले. अखेर सरकारने तुपकरांना रातोरात जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं.
तुपकर यांनी म्हटलं की, माझे अन्नत्याग सुरूच राहणार आहे. आता मी माझ्या निवासस्थानासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. नागपूर येथील अन्नत्याग आंदोलनादरम्यान काल रात्री 10.30 वा. नागपूर पोलिसांनी मला ताब्यात घेऊन आज सकाळी बुलडाणा येथील माझ्या निवासस्थानी आणून सोडले. माझ्या घरासमोर नागपूर व बुलडाणा पोलिसांचा पहारा आहे. पोलिसांनी अशा कितीही कारवाया केल्या तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, अशी माझी भूमिका आहे. अन्नत्याग आंदोलन केल्यामुळं रविकांत तुपकर यांची शुगर कमी झाली होती. पोलिसांनी तुपकर यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. पण तुपकर आंदोलनस्थळावरुन उठले नाहीत. त्यामुळं पोलिसांना अखेर कारवाई करावी लागली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …