‘रयत’मध्ये प्रतिमहा २० ते २५ कोटींचा भ्रष्टाचार – आमदाराच्या आरोपाने आघाडीत खळबळ

* आ. महेश शिंदे यांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा
सातारा – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार असलेल्या महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्था आणि शरद पवार कुटुंबीयांवर केलेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून येथील भ्रष्टाचाराच्या प्रति महिन्याचा आकडा सरासरी वीस ते पंचवीस कोटी असल्याचा आरोप करून आमदार महेश शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.
शिंदे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नियमावली तयार केली होती. त्यामध्येमहाराष्ट्रराज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे असा उल्लेख आहे.घटनेप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात. यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेलेअंतुले, वसंतदादा पाटील, बाबासाहेब भोसले यांनी रयतचेअध्यक्षपद भुषविले आहे, मात्र काही वर्षांपूर्वी शरद पवार हे रयतेचे अध्यक्ष झाले आणि कर्मवीर अण्णांनी लिहिलेली घटनाच त्यांनी बदलून टाकली. पवारांनी पुतण्या, मुलगी व नातवाला रयतमध्ये मॅनेजिंग कौन्सिलिंग व इतर पदांवर घेऊन घराणेशाही आणली आहे. असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
रयत ही महाराष्ट्र राज्याची संस्था आहे. ज्या कुटुंबातील लोकांनी रयत शिक्षण संस्थेत योगदान दिले, ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाना संस्थेतून काढू नका एवढंच माझं म्हणणं आहे.मी याबाबत प्रश्न उपस्थित केला ही माझी चूक झाली का? माझ्या जिल्ह्यातल्या तरुणांना गुणवत्तेवर रयतमध्ये नोकरी द्यावी, ही माझी मागणी चुकीची आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रयतमध्ये नोकरी देण्यासाठी चाळीस-चाळीस लाख रुपयेघेतले जातात. ही बाब चुकीची आहे यावर मी आवाज उठवला आहे. आज सातारा जिल्ह्याच्या हक्काच्या संस्था चालवतय कोण? या प्रश्नाने जनता उद्विग्न झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व इमारतींच्या पेंटिंग व फर्निचरची कामे बारामतीच्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात. या ठिकाणचे तरुण ही कामे करण्यास लायक नाहीत का? संस्था सांभाळायला सातारा जिल्हा सक्षम आहे. उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे. पारिवारिक ९ जण रयत संस्थेमध्ये घेतली असून त्यांचे रयतसाठी योगदान काय आहे? असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दु:ख वाटते अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …