ठळक बातम्या

रणवीर सिंगने शेअर केले मंडे मोटीव्हेशनल फोटो

आपल्या हटके लूक आणि अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत राहणारा रणवीर सिंग हा सोशल मीडियावर तितक्याच बिनधास्तपणे आपले फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतो. आताही त्याने चाहत्यांना मोटीव्हेट करत इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो जिममध्ये घाम गाळताना दिसून येतोये. या फोटोंमध्ये रणवीर सिंग ग्रे रंगाची बनियन आणि काळ्या रंगाचीपॅँट घालून आपले बायसेप्स आणि टायसेप्स फ्लाँट करताना पाहायला मिळत आहे.

रणवीरच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगलीच पसंती दर्शवली जात आहे. या फोटोंना आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोक फोटोंवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले आहे,’शट अप, मंडे मोटीव्हेशनल’. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीरचा बऱ्याच काळापासून चर्चेत असलेला ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात तो भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत तर दीपिका पदुकोण ही त्याची पत्नी रोमी देवीच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …