रणवीर सिंगने शर्टलेस फोटो शेअर करुन चाहत्यांना केले प्रेरित


बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या आपला आगामी चित्रपट 83 मुळे चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासूनच रणवीर आणि चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या दरम्यान रणवीरने परफेक्ट मंडे मोटीव्हेशनल फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तो वर्कआऊट करताना दिसून येत आहे.
रणवीर सिंगने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन मोनोक्रोम फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रणवीर वर्कआऊट नंतर शर्टलेस होऊन आपले ॲब्स बायसेप्स फ्लॉँट करताना दिसून येत आहे. रणवीरचे हे फोटो इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. हे सोशल मिडियावर शेअर करुन काही तास उलटत नाही तोच या फोटोंना साडेचार लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. रणवीर सिंगने पोस्ट वर्कआऊट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे,’ द प्रोसेस इज द प्राइज मंडे मोटीव्हेशन’
अलिकडेच 83 या चित्रपटाचे भावनांनी ओथंबून भरलेले लहरा दो हे गाणे रिलीज झाले होते. हे देशभक्तीपर गीत अरिजित सिंगने आपल्या शानदार आवाजात गायले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …