प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट ‘८३’च्या निर्मात्यांनी आयकॉनिक क्रिकेट ड्रामाचा टिझर रिलीज केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येत्या ३० नोव्हेंबर रोजी रिलीज होणार असून, चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.
टिझरची सुरुवात एका क्रिकेट स्टेडिअमद्वारे होते, ज्यात मॅच एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहचते. कबीर खानद्वारे दिग्दर्शित ‘८३’ हा चित्रपट यावर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट भारताच्या ऐतिहासिक १९८३ विश्व कप विजयाभोवती गुंफलेला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे, तर दीपिका पदुकोण या चित्रपटामध्ये कपिल देव यांची पत्नी रोमी यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय या चित्रपटात ताहिर राज भसीन, साकिब सलीम, हार्डी संधू, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे व पंकज त्रिपाठी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फॅँटम फिल्म्स, कबीर खान फिल्म्स प्रोडक्शन ‘८३’ हा चित्रपट सादर करत आहेत. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्ये ३ डी मध्ये रिलीज केला जाणार आहे.