रणवीरने खुलेआम कपिल देवला केले किस

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण अभिनित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘८३’ शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला आहे, परंतु त्यापूर्वी सेलेब्स आणि मीडियासाठी त्याचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या निमित्ताने ८३ वर्ल्डकपचा हिरो अर्थात भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव देखील आले होते. हे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफरही सरसावले होते. आता एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे रणवीर आणि कपिल देव हे दोघेही चांगलेच ट्रोल होत आहेत.
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये रणवीर आणि कपिल देव यांचा ब्रोमान्स पाहायला मिळत आहे. हा फोटो त्यावेळी क्लिक करण्यात आला होता, जेव्हा हे दोघे एकमेकांना शुभेच्छा देत होते. लोकांना असे वाटले की हे दोघे एकमेकांना किस करत आहेत. फोटो पाहून तर लोकांचा संशय अधिकच बळावला आहे. या फोटोवर लोक वेगवेगळे कमेंट्स करताना दिसून येत आहेत. या चित्रपटात लीड रोल साकारत असलेल्या रणवीर सिंगला ‘८३’ चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच जबरदस्त प्रतिक्रिया मिळत होत्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …