अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट ८३ हा येत्या २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे, परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलीवूड सेलेब्स आणि काही अन्य सेलिब्रेटींकरिता चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. हा चित्रपट पाहिल्यापासून सेलेब्स या चित्रपटाची भरभरून स्तुती करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ते या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘मी काल रणवीर सिंगचा ८३ पाहिला. कबीर खान सर आपण आम्हाला हा मास्टरपीस चित्रपट दिला आहे. मला हा चित्रपट खूप आवडला. रणवीर सिंग तुझ्या ॲक्टिंगकरिता माझ्याकडे शब्दच नाहीत. आपण रॉकस्टार आहात.’ त्याचबरोबर रियाने चित्रपट निर्मात्यांचे आभार मानत प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचा आग्रहही केला आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, ‘जेव्हा मी रणवीर सिंगचा ८३ पाहण्यासाठी गेलो, तेव्हा रणवीर सिंग कुठे दिसतच नव्हता. पडद्यावर केवळ कपिल देव होते. हे अविश्वसनीय परिवर्तन आहे, जे पाहून मी खूप हैराण झालो आहे. शानदार अभिनय आणि इमोशनची अशी काही जादू होती की, माझे डोळे पाणावले आणि मी अजूनही तितकाच रोमांचित आहे.’
रणवीरच्या ८३वर सेलेब्सच्या प्रतिक्रिया – मास्टरपिस