खेळांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांनी कायम आपली पसंती दर्शवली आहे आणि त्यात जर तो खेळ क्रिकेट असेल, तर मग काय सोने पे सुहागा! म्हणून तर रणवीर सिंगचा ८३ आणि शाहिद कपूरचा जर्सी हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. त्यातच आता हिंदी सिनेसृष्टीत आणखी एक स्पोर्ट्स ड्रामा फिल्म तयार होत असल्याची वंदता आहे आणि अशी चर्चा होण्याला कारण ठरलेय ते म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेली क्लिप.
क्लिपमध्ये कार्तिक हा क्रिकेट जर्सी परिधान करून पिचवर बॅटिंग करताना दिसून येतो आहे. हे पाहून जर त्याच्या चाहत्यांना कार्तिकही स्पोर्ट्स ड्रामा फिल्म करत असल्याचे वाटले, तर मग नवल ते काय? कार्तिकने या व्हिडीओला कॅप्शन दिली आहे, ‘लवकरच येत आहे.’ व्हिडीओ समोर आल्यापासूनच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. चित्रपटात कार्तिक हा विराट कोहलीची भूमिका साकारत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, मात्र या वृत्ताला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
राम माधवानी यांच्या धमाकामध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स दिल्यानंतर आता कार्तिकने अलीकडेच दिल्लीत आपले आगामी प्रोजेक्ट शहजादाचे एक प्रदीर्घ आणि कठीण शेड्यूल पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्याची लुका छुपीची सहकलाकार क्रिती सेननही दिसून येत आहे. हा चित्रपट तेलगू ॲक्शन ड्रामा ब्लॉकबस्टर चित्रपट अला वैकुंठपुरमुलूचा रिमेक आहे. शहजादा व्यतिरिक्त कार्तिककडे अनेक चित्रपट आहेत. त्यात शशांक घोष दिग्दर्शित फ्रेडीचा समावेश आहे. याशिवाय त्याच्याकडे कॅप्टन इंडिया नावाचाही चित्रपट आहे.
2 comments
Pingback: mushroom shop Oregon
Pingback: ประกันรถยนต์ ราคา