ठळक बातम्या

रजा घेण्यासाठी कर्मचाºयाने दिले अजब कारण

पोलिसांना डॉन पकडणे सोपे ठरेल, पण बॉसकडून सुट्टी घेणे अवघडच नाही, तर अशक्य! सामान्यत: कर्मचाºयांना काही अत्यंत महत्त्वाच्या किंवा गंभीर गोष्टींसाठीच रजा घेण्यास सांगितले जाते, पण लोकांच्या आयुष्यात अशी अनेक कामे असतात, जी आॅफिस किंवा बॉसला फारशी महत्त्वाची वाटत नाहीत, पण कर्मचाºयांसाठी ती खूप महत्त्वाची असतात. अशा परिस्थितीत त्या गोष्टींसाठी रजा मिळणे अवघड होऊन बसते. मग कर्मचा‍ºयांना विचित्र बहाणे करून सुट्टी घ्यावी लागते, परंतु एका व्यक्तीने रजा घेण्याचे असे कारण शोधून काढले, ज्यामुळे बॉस नाराज झाला. इतकेच नाही तर हा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोकही हैराण झाले आहेत की, कोणी असा बहाणा कसा करू शकतो.
इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे राहणाºया केन मोरेने नुकताच त्याच्या एका कर्मचाºयाला मेसेज करून आॅफिसला कधी येणार हे विचारले. आपल्या कर्मचाºयांनी नियमितपणे कार्यालयात यावे, अशी केनची नेहमीच इच्छा असते, पण कर्मचाºयाने उत्तर दिले की, त्याला स्वच्छ मोजे सापडत नाहीत आणि त्याच्या मैत्रिणीने त्याचे गलिच्छ मोजे धुतले नाहीत म्हणून तो आॅफिसमध्ये येऊ शकणार नाही. त्याच वेळी त्याने सांगितले की, त्याच्या चपलामध्ये छिद्र आहे, त्यामुळे तो मोज्याशिवाय शूज घालू शकत नाही. हा मेसेज वाचून केनला राग आला, पण तरीही स्वत:वर नियंत्रण ठेवत तो म्हणाला ‘तू गंमत करत आहेस का! तुझ्याकडे मोजे नाहीत म्हणून तू येत नाहीस! ही काय गंमत आहे. ठीक आहे, उद्या भेटू, पण तुझ्या जागी दुसरे कोणी असते, तर मी त्याला पुन्हा आॅफिसमध्ये येऊ दिले नसते.

केनचा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यापासून लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने सांगितले की, बॅकपॅकर्स ६ महिने तेच मोजे न धुता घालतात. त्यामुळे तोही घाणेरडे मोजे घालू शकत होता, तर दुस‍ºया एका व्यक्तीने सांगितले की, काल रात्री त्याने जास्त पार्टी केली असावी, म्हणून तो कार्यालयात न येण्याचे कारण बनवत आहे. दोन माणसांनी बॉसला सल्ला दिला की, केनने त्या माणसाला आॅफिसमध्ये येण्यास सांगावे आणि केन त्याला त्याच्या वतीने मोजे देईल. मग बघूया कर्मचारी काय म्हणतो. दुसºया व्यक्तीने सांगितले की, केनने स्वत: नवीन मोजे घेऊन कर्मचाºयाच्या घरी जावे म्हणजे वास्तव काय आहे ते कळेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …