रकुलप्रीतच्या छतरीवालीचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा लीड रोल असलेला चित्रपट छतरीवालीचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. रकुलप्रीत सिंगचा हा चित्रपट तेव्हापासून चर्चेत आहे जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटात रकुल एका कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवसकर करत आहे. रकुलनेही या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या चित्रपटातील आपला फर्स्ट लूक शेअर करताना रकुलप्रीतने लिहिले, ‘बिन मौसम बरसात कभी भी हो सकती हैं. अपनी छतरी तैयार रखिये. पेश हैं छतरीवाली का फर्स्ट लूक’ या चित्रपटात रकुलप्रीत एका छोट्या शहरातील बेरोजगार मुलीच्या भूमिकेत दिसून येणार आहे, जिला नोकरीची नितांत गरज आहे. अखेरीस तिला कंडोम टेस्टरची नोकरी मिळते जी तिला लपवावी लागते. या चित्रपटात रकुलप्रीत व्यतिरिक्त सुमित व्यास, सतीश कौशिक, राजेश तेलंग, प्राची शाह तसेच रिवा अरोडा आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. हा चित्रपट रॉनी स्क्रूवाला प्रोड्यूस करत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …