रंगीलाविषयी शेफाली शाहचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री शेफाली शाहने राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला या गाजलेल्या चित्रपटाविषयी एक आश्चर्यकारक खुुलासा केला आहे. शेफालीने या चित्रपटातील एका छोट्याशा भूमिकेद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. परंतु चार दिवसांच्या शूटिंगनंतर तिने हा चित्रपट सोडून दिल्याचे एका मुलाखतीत बोलताना सांगितले.
यासंदर्भात शेफालीने सांगितले की, तिची व्यक्तिरेखा शूटिंगच्या आधी सांगण्यात आलेल्या गोष्टींपेक्षा खूप वेगळी होती. हे असे काहीच नव्हते जे तिला करायचे होते. त्याचबरोबर शेफालीने असेही सांगितले की, रंगीलामुळे तिने ‘सत्या’करिता पुन्हा एकदा रामगोपाल वर्मा यांच्याबरोबर काम केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुकही झाले होते.

शेफालीने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात १९९५मध्ये केली होती. रंगीलानंतर ती सत्या या चित्रपटात दिसून आली होती, ज्याकरिता तिला बेस्ट ॲक्ट्रेसचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तिने गांधी माय फादर, दिल धडकने दो तसेच कमांडो-२ सह अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. खरेतर शेफालीला चित्रपटांपेक्षा वेब सीरिजमधून जास्त लोकप्रियता मिळाली. तिने दिल्ली क्राइम आणि अनकही सह अनेक वेब शोजमध्ये काम केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …