योगी सरकारच्या जाहिरातीवरून पुन्हा वाद?

  • कृष्णन यांचा ‘इस्लामोफोबिक’ म्हणत हल्लाबोल

लखनऊ – उत्तर प्रदेश निवडणुकीचा प्रचार जोरात रंगात आला आहे, पण निवडणुकीआधी योगी सरकारने केलेल्या एका जाहिरातीवरून पुन्हा एकदा प्रचंड वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत डाव्या नेत्या कविता कृष्णन यांनी या जाहिरातीबद्दल जोरदार आक्षेप घेत थेट आदित्यनाथ योगी यांच्यावर ही जाहिरात ‘इस्लामोफोबिक’ असल्याचे म्हणत हल्लाबोल केला आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर योगी सरकाने आपल्या कामकाजाची जोरदार जाहिरातबाजी सुरू केली. त्या संदर्भातली एक जाहिरात एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यात एकूण ५ वाक्य आणि २ चित्रं आहेत. जाहिरातीचा मथळा ‘फर्क साफ हैं’ असा आहे. त्या खाली ‘२०१७ पूर्वी’ अशी ओळ आहे. त्याखाली ‘दंगेखोराची भीती’ अशी एक ओळ आहे. त्या ओळीखाली गळ्यात रूमाल टाकलेला एक तरुण हातातली पेटलेली बाटली फेकत असल्याचे दाखवले आहे. पुढे चौथे वाक्य ‘२०१७ नंतर’ असे आहे. त्याखाली ओळ आहे, ‘मागत आहेत माफी’. या ओळीखाली तीच व्यक्ती दुसऱ्या पेहरावात हात जोडून माफी मागत असल्याचे दाखवले आहे. आता याबाबत कविता कृष्णन यांनी या जाहिरातीवरून ट्विट करत टीका केली. त्या म्हणतात, इंग्रजी वर्तमानपत्राच्या या पहिल्या पानावर नजर टाका. जिथे यूपी सरकारची एक इस्लामोफोबिक जाहिरातीचा आनंद घेतला जात आहे. आपण केवळ हा व्यावसायिक निर्णय असल्याचे ढोंग करू शकत नाही. ही जाहिरात म्हणजे संपादकीय निर्णय आहे. ती वृत्तपत्राला फाशीवादाची वाहक बनवते आणि ते भीतीदायक आहे. योगी सरकारची जाहिरात आणि कविता कृष्णन यांनी घेतलेला आक्षेप यावरून ट्विटरवर जबरस्त ट्रेंडिंग सुरू आहे. तिथे दोन गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात अभिषेक शाह नावाच्या एका युझरने कविता कृष्णन यांच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जाहिरातीमध्ये कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही. तुम्ही विनाकारण त्याला ‘इस्लामोफोबिक’ काय म्हणताय, असा सवाल केला आहे. दुसरीकडे अपुर्वानंद या युझरने जाहिरात पाहूनच शॉक बसल्याचे म्हटले आहे. हा ‘इस्लामोफोबिक’ प्रोपोगंडा आहे. योगी सरकारच्या यापूर्वीच्याही काही जाहिरातींवरून अशाच प्रकारे वाद निर्माण करण्यात आला होता. आता योगी सरकार याबाबत काय बाजू मांडते हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …