युवा खेळाडूंसाठी उत्तम संधी – मनप्रीत

भुवनेश्वर – ढाकामध्ये १४ डिसेंबरपासून सुरू होणारी आशिया चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी युवा खेळाडूंसाठी एक चांगली संधी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळाली असल्याचेपुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग म्हणाला.
मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत खेळणाऱ्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या आठ खेळाडूंना ढाक्यातील स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये अनुभवी गोलकीपर पी.आर. श्रीजेशचा समावेश आहे. १४ डिसेंबर रोजी सलामीच्या सामन्यात कोरियाशी दोन हात केल्यानंतर भारतीय संघाचा दुसऱ्या दिवशी बांगलादेशविरोधात सामना निश्चित करण्यात आला आहे. १७ डिसेंबर रोजी पाकिस्तान, १८ रोजी मलेशिया आणि १९ डिसेंबर रोजी जपानविरोधात अंतिम सामना असेल.
ढाकाला शुक्रवारी रवाना होण्यापूर्वी मनप्रीतने संवाद साधला. तो म्हणतो की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या स्पर्धांत चमक दाखवण्यास उत्सुक असणाऱ्या युवा खेळाडूंकडे ही स्पर्धा एक चांगली संधी आहे. टोकियोनंतर पहिल्यांदा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू मैदानावर उतरत आहेत. त्यामुळे ते नक्कीच उत्साही असतील. ढाक्यातील स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून भुवनेश्वरची शिबिरासाठी करण्यात आलेली निवड पथ्यावरील आहे. ढाका आणि भुवनेश्वरच्या वातावरणात फारसा फरक नाही. सराव शिबिरातून ढाक्यातील वातावरणाशी जुळवून घेता आले, असे मनप्रीतने सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …