युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित

मुंबई – भारतीय ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची बाधा झाली आहे. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सुंदरचा समावेश असून, या मालिकेच्या काही दिवस आधीच वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो या मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. येत्या १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रि केविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.
एका बातमीनुसार वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय सामन्यांसाठी रवाना होणार नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामने १९ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. एका क्रिकेटविषयक वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार सुंदरला कोरोनाची बाधा काही दिवसांपूर्वी झाली असून, तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात होता, पण आता तो बुधवारी संघासोबत आफ्रिकेला रवाना होणार नाही असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
मूळचा तामिळनाडूमधील असलेला २२ वर्षीय वॉशिंग्टन सुंदर कर्नाटकातील बंगळुरू (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी)मध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघाला असून, एक-दोन दिवसांत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार असलेल्या मर्यादित षटकांच्या अन्य क्रिकेटर्समध्ये त्याचा समावेश नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)च्या सूत्रांनी सांगितले की, वॉशिंग्टन सुंदर पॉझिटिव्ह निघाला असून, अद्यापपर्यंत त्याचा समावेश मर्यादित षटकांच्या निवडक खेळाडूंमध्ये केला गेलेला नाही. वॉशिंग्टन सुंदर एकदिवसीय मालिकेसाठी निवडले गेलेल्या अन्य खेळाडूंसोबत चार्टर्ड विमानामध्ये जाऊ शकणार नाही व बीसीसीआय त्याला स्वतंत्रपणे दक्षिण आफ्रिके ला पाठविणार की नाही? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुखापतीमळे गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापासून बाहेर असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते व आपल्या राज्याच्या (तामिळनाडू) टीमसाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. या ट्रॉफीमध्ये तामिलनाडूची टीम अंतिम फेरीत दाखल झाली होती.
एकदिवसीय सामने
१९ जानेवारी – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
२१ जानेवारी – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
२३ जानेवारी – न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊं ड, केपटाऊन – दुपारी दोन वाजता

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …