‘या’ वादावर बीसीसीआयच बोलेल – गांगुली

मुंबई – मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीमध्ये काहीतरी वाद असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात विराटने पत्रकार परिषदेत केलेल्या काही खुलाशानंतर तर काहीतरी वाद असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. विराटच्या मते कोणतीही चर्चा न करता एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून रोहितला देण्यात आल्याचे त्याने सांगितले. तर त्याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी विराटसोबत चर्चा केली होती, असे म्हटले होते. त्यामुळे दोन वेगवेगळ्या वक्तव्यानंतर गांगुलींचा विराटसोबत काही वाद आहे का? असेही प्रश्न समोर येऊ लागले. त्यावर स्वत: सौरव गांगुली माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले या वादाबाबतचे जे काही मत आणि निर्णय आहे तो बीसीसीआय देईल, मी याबद्दल काहीच बोलणार नाही. दुसरीकडे कर्णधारपदाच्या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयने अधिकृ त वक्तव्य केलेले नाही. पण बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद स्वत:हून सोडले. त्यानंतर मर्यादित षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार म्हणजे टी-२० साठी रोहित आणि एकदिवसीयसाठी विराट असल्यास संघाच्या खेळावर परिणाम होईल, त्यामुळे रोहितकडेच दोन्ही जबाबदाऱ्या दिल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …