या महिलेची बॉडी करते पुरुषांनाही अचंबित

सध्या नेदरलँड्समध्ये राहणाºया ४१ वर्षीय मारिया वेटेलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगातील सर्वात उंच महिला बॉडी बिल्डर म्हणून मारियाचे नाव नुकतेच गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाले आहे. मारियाची उंची १८२.७ सेमी आहे. विश्वविक्रम केल्यानंतर तिचे व्हायरल होणारे फोटो पाहून कोणत्याही पुरुषाला लाज वाटेल. भारतामध्ये बॉडीसाठी लोक सलमान खानचे उदाहरण देतात, तर मारियाचे डोले पाहून सलमान भाऊही फिके पडतील.
मारिया वेटेलने वयाच्या १९व्या वर्षी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली. कठोर प्रशिक्षणानंतर, तिने प्रथम मार्च २००५मध्ये स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तिच्या उंचीमुळे ती पहिल्यापासूनच लोकांच्या नजरेत होती; पण मित्राच्या विनंतीनंतर तिने विश्वविक्रमासाठी अर्ज पाठवला ज्यामध्ये तिची निवड झाली.

एवढ्या उंचीमुळे मारियाला बॉडी बिल्डिंग करताना खूप त्रास होतो. अनेक स्पर्धांमध्ये आपल्यावर अन्याय झाला; पण आता या विक्रमानंतर बरे वाटत असल्याचे तिने सांगितले.
मारियाची उंची ५ फूट ११.९२ इंच आहे, जी अद्याप कोणत्याही महिला बॉडी बिल्डरसाठी खूप जास्त आहे. सुरुवातीला तिचा स्वत:वर विश्वासच बसला नाही. शेवटी विजय मिळाल्यावर तिला तिच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे ती सध्या खूपच आनंदी आहे.

सोशल मीडियावर मारियाच्या फोटोंचा बोलबाला आहे. तिने तयार केलेली शरीरयष्टी पाहून पुरुषही हैराण होतात.
मारियाने या शरीरासाठी खूप मेहनत घेतली आहे. अन् अजूनही ती मेहनत घेत आहे. तिचे प्रशिक्षण आणि आहार यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ती तिच्याबद्दल बोलताना सांगते की, ज्या उंचीमुळे ती विचित्र वाटत होती, आता त्याच उंचीमुळे तिला प्रसिद्धी मिळत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …