ठळक बातम्या

या ‘बॅट’ ला लिलावात मिळाले चक्क २५ हजार डॉलर

 

नवी दिल्ली – भारताच्या २०११ विश्वचषक विजेता संघाच्या स्वाक्षरी असलेल्या बॅटला दुबईतील एका लिलावात २५ हजार डॉलरमध्ये विक्री करण्यात आली, तर डेव्हिड वॉर्नरच्या २०१६ आयपीएल विजेता सनरायजर्स हैदराबादच्या जर्सीसाठी चक्क ३० हजार डॉलरची बोली लावण्यात आली. क्रिकफ्लिक्सद्वारे आयोजित या लिलावात जिथे वॉर्नरच्या जर्सीसाठी सर्वात मोठी बोली लागली, तर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील संघाच्या स्वाक्षरी असलेल्या बॅटला डिजिटल अधिकारांमध्येही लोकांनी आवड दाखवली. धोनीच्या नेतृत्वात भारताने २०११ मध्ये २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला होता. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या २०० व्या कसोटी सामन्यातील संग्रहाचे डिजिटल अधिकार मुंबईत राहणाऱ्या अमल खान यांनी ४० हजार अमेरिकन डॉलर (जवळपास ३०,०१,४१० रुपये) मध्ये प्राप्त केले. या संग्रहात स्वाक्षरी असणारी जर्सी, खास स्मारक कव्हर व स्वाक्षरी असणाऱ्या मॅच तिकीटचा इत्यादी समावेश आहे. भारताच्या १९८३ विश्वचषक विजेत्या संघासाठी सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या संगीत कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगला २१ हजार डॉलर (१५,७५,७४० रुपये) मध्ये विकत घेतले, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साकारलेले व्यंगचित्र व १९५२ मध्ये भारताच्या पहिल्या पाकिस्तान दौऱ्यातील स्वाक्षरीला प्रत्येकी १५ हजार डॉलर (११, २५, ५२८ रुपये) चा लिलाव मिळाला. भारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू यांचे संग्रह, ज्यात त्यांचा मूळ बँक पास बूक व पासपोर्टचा समावेश आहे, ज्याचे डिजिटल अधिकार अनुक्रमे ७५०० डॉलर (५, ६२, ७२५ रुपये) व ९८० डॉलर (७३,५२९ रुपये)मध्ये विक्रीस गेले. भारतीय महिला वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीच्या विश्वचषक २०१७ मधील सेमीफायनलमध्ये परिधान केलेल्या जर्सीला १० हजार डॉलर (७,५०,३०० रुपये) ची बोली मिळाली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …