ठळक बातम्या

या दोन नायिकांमुळे थांबवला सलमान खानचा इंशाअल्लाह

गोलियों की रासलीला, जोधा अकबर, पद्मावत, बाजीराव मस्तानी असे अनेक सुपरहिट बिग बजेट चित्रपट देणारे चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी समोर आली आहे. पद्मावत चित्रपटानंतर सलमान आणि आलियाला त्यांच्या आगामी ‘इंशाअल्लाह’ चित्रपटासाठी साइन केले आहे. या मेगा बजेट चित्रपटाची घोषणा जितक्या जोरात झाली, तितक्याच लवकर तो स्थगितही करण्यात आला.
सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील मतभेदामुळे हा चित्रपट कधीच फ्लोअरवर गेला नाही, मात्र अभिनेता सलमान खान आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी आजपर्यंत हा चित्रपट का बंद झाला, यावर मौन सोडलेले नाही.

संजय लीला भन्साळी यांच्या प्रेमकथांपैकी एक असलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’नंतर, त्याने जवळजवळ प्रत्येक प्रेमकथेमध्ये प्रेम त्रिकोणावर नक्कीच काम केले आहे. इंशाअल्लाह चित्रपटाच्या युनिटशी संबंधित लोकांवर विश्वास ठेवला, तर यावेळीही भन्साळींना सलमान खान आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय दुसरा चेहरा चित्रपटात कास्ट करायचा होता, ज्यामुळे कथेला एक नवीन वळण

 

मिळते. पण सलमानला काही वेगळेच मंजूर होते, रिपोर्टनुसार, सलमान खानने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासमोर अशा दोन अटी ठेवल्या होत्या, ज्यामुळे चित्रपट कधीच फ्लोरवर जाऊ शकला नाही. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, सलमान खानने संजय लीला भन्साळी यांना चित्रपटात सुष्मिता सेनचा स्पेशल डान्स नंबर घ्यायला सांगितला होता आणि अभिनेत्री डेझी शाहने कॅमिओ करावा, अशी अटही ठेवली होती. संजय लीला भन्साळी यांना सलमान खानच्या या दोन्ही अटी आवडल्या नाहीत आणि त्यांनी शेवटी चित्रपट स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
भन्साळींनी १९९९मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ बनवला होता, ज्यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या जोडीने बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घातला होता. २००७मध्ये भन्साळींच्या ‘सावरिया’ चित्रपटातही सलमान दिसला होता आणि सध्या भन्साळी त्यांच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्याच वेळी ते हिरामंडीसारख्या मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …