इलेक्ट्रॉनिक सिटी, बंगळुरू येथे ‘इमॅजिन क्लोथ्स बँक’ नावाचे कपड्यांचे दुकान सुरू करण्यात आले आहे, जे केवळ गरजू लोकांसाठी बनवले गेले आहे. या दुकानातील सर्व कपडे अवघ्या १ रुपयाला विकले जातात. म्हणजेच जीन्स असो वा टी-शर्ट, पँट असो की शर्ट, इथून खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत फक्त १ रुपया आहे. या १ रुपयात ग्राहक काहीही खरेदी करू शकतात. हे अनोखे दुकान ४ मित्रांची कल्पना आहे.
श्रीमंत आणि उच्चभ्रू लोक त्यांना हवे तितके कपडे खरेदी करू शकतात. तुम्ही प्रत्येक नवीन फॅशन स्वीकारू शकता आणि तुमची शैली बदलू शकता, परंतु गरीब लोकांसाठी कपडे घालणे ही मोठी गोष्ट आहे, त्यांना शैली शोधणे आणि फॅशनचे अनुसरण करणे अशक्य आहे; पण ४ मित्रांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. त्यांनी गरजूंसाठी एक खास दुकान सुरू केले आहे, ज्याद्वारे ते कधीही येऊन फक्त१ रुपयात कपडे खरेदी करू शकतात.
इलेक्ट्रॉनिक सिटी, बंगळुरू येथे ‘इमॅजिन क्लोथ्स बँक’ नावाचे कपड्यांचे दुकान सुरू करण्यात आले आहे, जे केवळ गरजू लोकांसाठी बनवले गेले आहे. या दुकानातील सर्व कपडे फक्त १ रुपयाला विकले जातात, म्हणजेच जीन्स असो वा टी-शर्ट, पँट असो की शर्ट, इथून खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत फक्त १ रुपया आहे. या १ रुपयात ग्राहक काहीही खरेदी करू शकतात.
हे अनोखे दुकान ४ मित्रांची कल्पना होती, जे मंगळुरूमधील महाविद्यालयात एकत्र शिकायचे. या मित्रांनी २०१३मध्ये इमॅजिन ट्रस्ट नावाने एक एनजीओ सुरू केली, जी ते त्यांच्या नोकरीसह सांभाळत असत; पण मेलिशा नावाची मैत्रिण पूर्णवेळ एनजीओमध्ये रुजू झाल्यावर मित्रांनी एनजीओच्या माध्यमातून मोठे प्रोजेक्ट्स घ्यायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक अचंबित करणाºया कलाकृतींचा उलगडा केला. याची सुरुवात मेलिशाचा पती विनोद, तिची आई ग्लॅडिस आणि इतर दोन मित्र नितीन कुमार आणि विघ्नेश यांनी केली होती.
हे कपड्यांचे दुकान १२ सप्टेंबर रोजी सुरू झाले होते. हे दर रविवारी उघडते आणि कोणत्याही वयोगटातील लोक येथे येऊन कपडे घेऊ शकतात. कपड्यांची किंमत १ रुपये ठेवण्यामागील कारण म्हणजे ग्राहकांचा आदर राखला जावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच ते कपडे फुकट घेत नाहीत, तर किंमत मोजून विकत घेत आहेत. यातून जे काही पैसे जमा होतात ते हे चार मित्र गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. या दुकानात चादर, टॉवेल, कपडे, पडदे इत्यादी वस्तू मिळतात आणि दर आठवड्याला सुमारे १५० कुटुंबे येथे येतात.