एका जादुई तलावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोहता येत नसलेल्या एका व्यक्तीने खाली उतरताच स्वत:हून पोहायला सुरुवात केली. हा जादुई तलाव प्रत्यक्षात इजिप्तमधील आहे. पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने त्यात कोणीही बुडू शकत नाही. एखाद्याला पोहणे येत नसले, तरी तो आपोआप या तलावात पोहायला लागतो.
तुम्ही शाळेत खाºया पाण्याचे अनेक प्रयोग केले असतील. यापैकी एका प्रयोगात अंडी खारट पाण्यात टाकून त्यांची चाचणी करण्याचा प्रकल्प होता. खाºया पाण्यात काहीही बुडू शकत नाही. अशा स्थितीत अंडी मिठाच्या पाण्यात टाकताच ते तरंगतात. खाºया पाण्याच्या या प्रयोगाची नैसर्गिक आवृत्ती इजिप्तमध्ये पाहायला मिळाली. येथे उपस्थित असलेल्या सिवा ओएसिसचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका रिकाम्या खडकाळ भागाच्या मध्यभागी बांधलेल्या या तलावात एक व्यक्ती बुडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, पण तो माणूस स्वत: पाण्यात पोहू लागला.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्या व्यक्तीने बरेच काही लिहिले आहे. यामध्ये त्या व्यक्तीने सांगितले की, त्याला पोहणे येत नाही. या जादुई तलावात अल्किनने स्वत:हून पोहायला सुरुवात केली. ज्यांना पोहणे येत नाही, त्यांच्यासाठी ही खूप मजा आहे. इजिप्तमध्ये असलेली अशी मिठाची सरोवरे खूप प्रसिद्ध आहेत. त्यांना पाहण्यासाठी लांबून लोक येतात. ज्या तलावात हा व्हिडीओ बनवला आहे. त्याची खोली ४ मीटर आहे, तसेच यातील पाण्यात ९५ टक्के मीठ असते.
शिवाच्या या खारट सरोवराचे पाणी निळ्या रंगाचे आहे. पाण्यात मिठाचे प्रमाण इतके जास्त आहे की, त्यात कोणीही बुडू शकत नाही. या पाण्यात उतरताच तुम्ही आपोआप पोहायला सुरुवात कराल. व्हिडीओ शेअर झाल्यापासून आतापर्यंत लाखोंच्या संख्येने तो पाहिला आहे. अनेकांनी या तलावाचे सुंदर वर्णन केले आहे, मात्र हे पाहिल्यानंतर अनेकांनी ते धोकादायक असल्याचेही लिहिले. एका व्यक्तीने कमेंट केली आणि लिहिले की, ते दिसण्यात अप्रतिम आहे, पण जर मला त्यात उतरायला सांगितले तर नो थॅक्स.
आम्ही तुम्हाला सांगतो की, जगात अशी एक नदी आहे, ज्यामध्ये काहीही बुडत नाही. डेड सी म्हणून ओळखली जाणारी नदी, जी इस्रायलमध्ये आहे. तेथे देखील त्यात मीठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोणीही बुडत नाही. सध्या इजिप्तच्या या सुंदर तलावाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.