या टीव्ही अभिनेत्रीने सलमानला केले लग्नासाठी प्रपोज


बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे फॅन फॉलोइंग कुठपर्यंत पसरलेले हे काही नव्याने सांगायला नको. त्याचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात तर आहेतच परंतु त्याचबरोबर त्याच्याशी विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणींची संख्या अगणित आहे. आजही लाखो तरुणी त्याच्या हॅँडसम लुकवर आपली जान छिडकताना दिसतात. यात त्याचे चाहतेच नाही तर तमाम टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्रीही आहेत. आता टीव्हीवरच्या एका प्रख्यात अभिनेत्रीने सलमानला लग्नासाठी खुलेआम प्रपोज केले आहे.
ही अभिनेत्री अन्य कुणी नाही तर अनीता हसनंदानी आहे. अनीताने सोशल मिडियाद्वारे सलमानला लग्नासाठी प्रपोज केले आहे. अनीता सोशल मिडियावर चांगल्याच सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपल्या चाहत्यांकरिता नेहमीच खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनीता हसनंदानीने आता आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अनीता खूप लडिवाळं एक्स्प्रेशन्स देताना दिसून येतेयं. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला इंग्रजीत मैं तुमसे शादी करने जा रही हूं हे गाणे वाजताना ऐकू येते. त्याच बरोबर सलमानचे फोटोही दिसून येतात. हा व्हिडिओ शेअर करताना अनीताने एक मजेदार कॅप्शन दिले आहे व सलमानला लग्नासाठी प्रपोज करण्याकरिता आपला पती रोहित रेड्डी याची माफीही मागितली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे,’ माफ कर बेबी. मला यावर्षी एक इमानदार रिल बनवायची होती.’ सोशल मिडियावर अनीताचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …