ठळक बातम्या

‘या’ गावातील मुली मोठे होताच होतात मुलगे, शास्त्रज्ञही हैराण

 

बहुतेक मुला-मुलींसाठी तारुण्य हा विचित्र आणि कठीण काळ असतो. यावेळी आवाज जड होऊ लागतो, मूड बदलतो आणि बरेच शारीरिक बदल होऊ लागतात, पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, जगाच्या नकाशावर असे एक गाव आहे, जिथे एका विशिष्ट वयानंतर मुली मुलगे होतात, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

ऐकून कुणालाही खरे वाटणार नाही?, पण ते पूर्णपणे खरे आहे. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये ला सॅलिनास व्हिलेज नावाचे एक गाव आहे. इथल्या मुलींमध्ये ठराविक वयानंतर लिंग बदल होतो. यानंतर येथील मुली मुले होतात. त्यामुळे येथील लोक या गावाला शापित गाव मानतात. हे रहस्य आजतागायत शास्त्रज्ञही शोधू शकलेले नाहीत.
ला सॅलिनास गावातील अनेक मुली वयाच्या १२ व्या वर्षी मुलांमध्ये बदलू लागतात. गावातील मुलींना मुलगा होण्याच्या ‘रोग’मुळे येथील लोक प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यामुळे याठिकाणी कोणत्या तरी अदृश्य शक्तीची छाया असल्याचा गावातील अनेकांचा समज आहे. याशिवाय काही वृद्ध लोक गावाला शापित मानतात. अशा मुलांना ‘गुवेडोसेस’ म्हणतात.

गावात कोणाच्या घरी मुलगी झाली की, त्या कुटुंबात शोककळा पसरते. कारण त्यांची मुलगी मोठी झाल्यावर मुलगा होईल याची त्यांना भीती वाटते. या आजारामुळे गावातील मुलींची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. या अनाकलनीय आजारामुळे आजूबाजूच्या गावातील लोक या गावाकडे वाईट नजरेने पाहतात.
समुद्रकिनारी असलेल्या या गावाची लोकसंख्या सहा हजारांच्या आसपास आहे. आपल्या अनोख्या आश्चर्यामुळे हे गाव जगभरातील संशोधकांसाठी संशोधनाचा विषय राहिले आहे. दुसरीकडे हा आजार ‘जेनेटिक डिसऑर्डर’ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्थानिक भाषेत या आजाराने ग्रस्त बालकांना ‘स्यूडोहर्माफ्रोडाईट्स’ म्हणतात. ज्या मुलींना हा आजार होतो, त्या वयात आल्यावर त्यांच्या शरीरात पुरुषांसारखे अवयव तयार होऊ लागतात. त्यांचा आवाज जड होऊ लागतो आणि शरीरात असे बदल येऊ लागतात, ज्यामुळे हळूहळू त्या मुलींतून मुलगा बनतो. गावातील ९०पैकी एक मूल या अनाकलनीय आजाराशी झुंज देत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …