या अटीवर बॉलीवूड चित्रपट करण्याची अल्लू अर्जुनची तयारी

सध्या दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा आपल्या पुष्पा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसून येतोयं. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने, तर बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. हिंदी व्हर्जनमध्ये पुष्पा लवकरच ७५ कोटींचा आकडा पार केला आहे. अशाप्रकारे अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटी रुपये कमावले आहेत.
पुष्पानंतर अल्लू अर्जुनची बॉलीवूडमधील फॅन फॉलोइंग वाढताना दिसून येतेयं. त्याची ही लोकप्रियता पाहून त्याला आता हिंदी चित्रपटांच्याही ऑफर्स येऊ लागल्या आहेत, परंतु अल्लू अर्जुनला हिंदी चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. बॉलीवूड चित्रपटांवर बोलताना अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या, परंतु त्यापैकी कोणतीही इतकी एक्सायटिंग नव्हती, ज्याकरिता तो लगेच हो म्हणू शकला असता. अल्लू अर्जुन दोन दशकांपेक्षाही जास्त साऊथ चित्रपटांचा हिस्सा आहे, परंतु त्याला बॉलीवूडचा हिस्सा बनण्यास मात्र वेळ लागणार आहे. अल्लू अर्जुन म्हणतो की, तो हिंदी फिल्म करण्यासाठी तयार आहे, परंतु एक चांगली स्टोरी मिळायला हवी. जेव्हा तो हिंदी स्क्रप्टि घेतोे, तेव्हा त्याला अन्य कुणा अभिनेत्यासाठी दुसरी भूमिका साकारण्यात काहीच स्वारस्य नसते. एक नायक म्हणून त्याला नेहमी मुख्य भूमिका साकारण्याची इच्छा आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …