कराची – पाकिस्तान क्रिकेट बोर्डा (पीसीबी)चे अध्यक्ष रमीज राजा यांनी बुधवारी स्वीकारले की, लेग स्पिनर यासिर शाहवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला मदत करण्याचे आरोप लागणे, खेळासाठी चांगले नाही, कारण खेळाडूंबाबत नेहमीच ‘खेळदुताच्या रूपात’ त्यांच्या भूमिका सांगितल्या जातात.
दोन दिवसआधी इस्लामाबादच्या शालीमार पोलीस स्टेशनमध्ये एका पीडित दाम्पत्याने एफआयआर नोंदवली, ज्यात यासिर शाहचे नाव देखील आहे. दाम्पत्याने आरोप केला की, या क्रिकेटपटूच्या आपल्या मित्राची मदत केली. यासिरला माहीत होते की, त्याच्या मित्राने आमच्या १४ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार केला असून, त्याचा व्हिडीओ देखील बनवला आहे. बुधवारी एका पत्रकार परिषदेत रमीज म्हणाले की, यात कोणतीच विचार करण्याची गोष्ट नाही की, यासिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. आम्ही या खेळाडूंना प्रशिक्षित व शिक्षित करतो की, त्यांची भूमिका ही एका खेळ दूताची असते व त्यांना ठाऊक असायला हवे की, त्यांना एखाद्याबाबत केव्हा, कुठे व कशाप्रकारे व्यवहार करायचा आहे. दरम्यान, एफआयआरमध्ये हे देखील नमूद करण्यात आले की, जेव्हा हे दाम्पत्य मदतीसाठी यासिरकडे गेले, तेव्हा त्याने हसत आम्हाला घराबाहेर केले, संपूर्ण घटना त्याला थट्टा वाटत होती व त्याने आम्हाला व भाचीला जीवे मारण्याची धमकी दिली. सोबतच हे देखील तो आम्हाला म्हणाला की, मी माझ्या प्रभावाचा वापर करत न्यायालयात नाक घासायला लावेन. यासिर व त्याच्या मित्राचा संपर्क होत नाही आहे व पोलीस अद्याप त्यांच्या शोधात आहेत. पीसीबी अध्यक्ष म्हणाले की, मला नाही माहीत, या प्रकरणात काय तथ्य आहे, पण हे तथ्य आहे की, अशाप्रकारच्या बातम्या पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगल्या नाहीत. अशावेळी जेव्हा पाकिस्तान क्रिकेटसाठी पुन्हा चांगले दिवस परतत आहेत. रमीज म्हणाले की, यासिर समवेत सर्व करारबद्ध खेळाडूंना नियमितपणे खेळदुताच्या त्यांच्या जबाबदारींची आठवण करून देण्यात येते व सोबतच त्यांना सांगण्यात येते की, सार्वजनिक ठिकाणी त्यांची वागणूक कशी असावी.