याच्यामुळे पसरला जगात ‘एड्स’सारखा भयंकर आजार

जागतिक एड्स दिन दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस १९८८ पासून सुरू झाला. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांना या आजाराबाबत जागरूक करणे आहे. एड्स हा असाध्य आजार आहे, ज्यावर कोणताही इलाज नाही; पण काही खबरदारी घेतल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेनंतर आता या आजाराबाबत लोकांच्या मनातील गैरसमज संपुष्टात आले आहेत; पण अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल लोकांना अजूनही माहिती नाही.
एचआयव्ही एड्सबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बहुतेक लोकांना माहिती नसतात. हा धोकादायक आजार जगात कसा पसरला, हे फार कमी लोकांना माहिती आहे. याशिवाय ज्या व्यक्तीला पहिल्यांदा एड्स झाला होता. आज येथे त्याबद्दल माहिती देणार आहोत. एचआयव्हीचा विषाणू चिम्पांझीपासून मानवामध्ये पसरला. हा विषाणू आफ्रिकेतील काँगोच्या जंगलात राहणाºया चिम्पांझीच्या शरीरात होता. १९२० मध्ये एका शिकारीने त्याला जखमी केले. चिम्पांझीच्या शरीरातून रक्त बाहेर आले आणि शिकारीच्या शरीरातून बाहेर पडलेल्या रक्तात मिसळले. अशा प्रकारे हा विषाणू मानवी शरीरात पोहोचला. तथापि, अनेक तज्ज्ञ या कथेवर विश्वास ठेवत नाहीत.

आता आपण त्या व्यक्तीबद्दल सांगू ज्याला एचआयव्हीचा पहिला रुग्ण म्हटले जाते. त्याचे नाव गेटन दुगास होते. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अहवालावर विश्वास ठेवल्यास एड्स पसरवण्यात या समलिंगी व्यक्तीचा हात आहे. गेटन हा कॅनडाचा फ्लाइट अटेंडंट होता. गेटन हा समलिंगी होता आणि मुद्दाम अनेक लोकांपर्यंत हा आजार त्याने पसरवला. गेटनला कळले की, त्याला एड्स आहे आणि त्यावर कोणताही इलाज नाही. असे असूनही त्याने अनेकांना हा आजार पसरवला. गेटन दुगास यांना पेशंट झिरो असेही म्हणतात. सुरुवातीची काही वर्षे हा आजार फक्त पुरुषांमध्येच दिसत होता.
एड्सशी संबंधित आणखी एक खास गोष्ट म्हणजे अमेरिकेत जेव्हा लोकांना या आजाराची माहिती मिळाली, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. पुढील ८ वर्षांपर्यंत हा रोग पहिल्यांदा उदयास आला तेव्हापासून सुमारे ९२ टक्के एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक पुरुष होते. केवळ ८ टक्के महिला या असाध्य आजाराने त्रस्त होत्या. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …