ठळक बातम्या

याचे परिणाम मलिकांना भोगावे लागतील – चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुंबई – देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. यावेळी मलिकांनी फडणवीस यांच्यावर असंख्य आरोप केले. मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा पलटवार फडणवीसांनी केला. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर टीका केली आहे. नवाब मलिक हे समीर वानखेडेंवर जे आरोप करत आहेत, त्यातून येणाऱ्या परिणामांची काळजी करावी; पण भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये ओढण्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.

पाटील म्हणाले की, नवाब मलिक हे समीर वानखेडेंवर जे आरोप करत आहेत, त्यातून येणाऱ्या परिणामांची काळजी करावी; पण भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये ओढण्याचे परिणाम भोगावे लागतील. ज्यावेळी पुराव्याशिवाय बोलले जाते, तेव्हा पुरावे नाही सापडले, तर जी स्थिती होते ती फार वाईट असते. महाविकास आघाडी प्रत्येकवेळी असा चेहरा उभा करते, ज्यातून सामान्यांच्या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरू होते. महाराष्ट्रात महापुरामुळे पीक, जमीन वाहून गेली, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे नोंदवले जात आहेत. या प्रश्नांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही नसल्यामुळे अशा प्रकारचे बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न चालला आहे. मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री गायब तरी आहेत किंवा त्यांच्यावर आरोप तरी आहेत. अनिल देशमुखांची काळजी करण्याआधी ते वानखेडेंची काळजी करायला लागले आहेत. वानखेडेंच्या मागे समाज पूर्णपणे ठामपणे उभा राहील. भाजप अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यासोबत आहे. नीरज गुंडे सामाजिक कार्यकर्ता आहे; पण तुम्हाला पुरावे सापडले असतील, तर चौकशी करा. संजय राऊत कमी पडत आहेत, म्हणून नवाब मलिक जोडले गेले आहेत का?, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. गेल्या १९ महिन्यांत तुम्ही कोणाचीही चौकशी करू शकले नाही. उलट तुमच्या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही; पण लोकांमध्ये घरोघरी त्यावर चर्चा होते. १९ महिन्यांत तुम्ही आमचे काही करू शकले नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …