ठळक बातम्या

यवतमाळ : डॉक्टर हत्या प्रकरणात तिघांच्या मुसक्या आवळण्यात यश

यवतमाळ – येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याचा १० नोव्हेंबरला खून झाला होता. याप्रकरणी यवतमाळ पोलिसांनी ३ आरोपींना १३ नोव्हेंबरला अटक केली. महावीरनगरातील ऋषिकेश सवळे (२३), सावित्रीबाई फुले सोसायटीतील प्रवीण गुंडजवार (२४), अशी आरोपींची नावे आहेत. तसेच, एका अल्पवयीन बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अशोक पाल, असे खून झालेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून, यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. मुलींच्या वसतिगृहाजवळ आरोपींच्या दुचाकीचा अशोकला धक्का लागला होता. यावरून झालेल्या वादातून अशोकवर चाकूने वार करण्यात आले. जखमी झालेल्या अशोकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यवतमाळ पोलिसांनी शनिवारी पहाटे ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिली. गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अधीक्षक डॉ. मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली होती. तिघांना अटक करणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. धमकी देणाऱ्या राजकीय नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय महाविद्यालय परिसरात येण्यावर बंदी घालण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीम म्हैसकर यांनी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या मान्य होतील, असे आश्वासन त्यांनी दिले. पाच सदस्यीच चमूने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. अंकित गौरखेडे यांनी मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …