मुंबई – म्हाडा परीक्षेमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करून, रद्द केलेली परीक्षा ‘टीसीएस’ या संस्थेमार्फत घेणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. परीक्षेत पारदर्शकता आणि प्रामाणिक, हुशार, गरीब घरांतून आलेल्या मुलांचे हक्क डावलले जाऊ नये, हाच उद्देश असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
टीसीएससारख्या विश्वविख्यात आणि इतिहासात कधीच चुका केल्या नसलेल्या संस्थेमार्फत आम्ही येणारी परीक्षा घेणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले, तसेच गुन्हेगार प्रवृत्तीचे जे विद्यार्थी असतील जे कोणाला हाताशी धरून जर जागा हिसकावून घेत असतील ते थांबवणे आमचे कर्तव्य आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
ज्यांनी आपल्याला नोकरी मिळेल, या इच्छेपोटी पैसे दिलेत त्यांना आम्ही गुन्हेगार ठरवणार नाही. त्यात विद्यार्थ्यांची काहीही चूक नाही, पण तुम्ही जर दलालांना पैसे दिले असतील तर त्या दलालांची नाव आम्हाला कळवा त्यांना धडा शिकविण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असेही आव्हाड म्हणाले.