मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता या परीक्षा पुढील वर्षी होतील, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री एका व्हिडीओद्वारे दिली. त्यांनी ट्विटर आणि म्हाडाच्या वेबसाइटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, तसेच या व्हिडीओतून जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे; मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओमध्ये स्पष्ट सांगितले की, काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहेत. ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत
माझी या दलालांना नम्र विनंती आहे की, हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले, तसेच ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे, असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरीबाचे शाप घेऊ नका कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत, कारण तुमच्या पैशांनी हे काम होईल हा जरी तुम्हाला कोणी विश्वास दिला असेल, तर ते कदापि शक्य नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दलाली करणाऱ्यांना दिला आहे.
2 comments
Pingback: Public Health Degree in Africa
Pingback: Grand daddy purple https://exotichousedispensary.com/product/grand-daddy-purple/