म्हाडाच्या ऑनलाइन परीक्षा १ फेब्रुवारीपासून

मुंबई – म्हाडामध्ये नोकरी मिळवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात म्हाडाची ऑनलाइन परीक्षा होणार आहे. परीक्षा घेण्यासाठी टीसीएसची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. म्हाडा भरती परीक्षा १ ते १० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. म्हाडाच्या नोकरभरतीची परीक्षा आता ऑनलाइन होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने हा निर्णय घेतला आहे.
म्हाडा भरती परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या जी. एस. कंपनीचा करार रद्द करण्यात आला आहे. म्हाडातील १४ पदांसाठीच्या ५६५ रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे. म्हाडातील १४ पदांसाठीच्या ५६५ रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा रविवार (१२ डिसेंबर), बुधवार (१५ डिसेंबर), रविवार (१९ डिसेंबर) आणि सोमवार (२० डिसेंबर) अशा चार टप्प्यांत घेण्यात येणार होती, मात्र सचिवांनी पुढील तारीख न सांगता परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली होती. अखेरच्या क्षणी स्थगितीच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला होता.
आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या कारणाने परीक्षा रद्द करण्यात आली होती, याविषयीची माहिती खुद्द राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. परीक्षा पास करण्यासाठी मध्यस्थांना पैसे देण्यात आल्याची माहिती आव्हाडांनी दिली होती. परीक्षा रद्द करत असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …