नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपल यांनी पुन्हा एकदा क्रिकेटबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, सर्वोत्तम आकाराच्या बॅट व छोट्या मैदानांमुळे गोलंदाज हे ‘व्हर्च्युअल गोलंदाजी मशीन’ बनत आहेत, तसेच चॅपल यांनी खेळाच्या संरक्षकांना टी-२० क्रिकेटमध्ये खेळ व मनोरंजनात संतुलन कायम राखण्यासाठी सुधारणात्मक पावले उचलण्याची मागणी केली आहे.
चॅपल नेहमीच ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माध्यमातून स्तंभलेख लिहीत असतात. यावेळीही त्यांनी आपल्या लेखात क्रिकेटमधील विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, प्रशासकांनी बॅट व बॉल यांच्यातील आदर्श समतोल शोधणे व प्रशासकांना क्रिकेटच्या महत्त्वाबाबत शिक्षीत करणे गरजेचे आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार पुढे म्हणतात, जेव्हा बॅटच्या मधोमध लागून बॉल स्टेडियममध्ये जातो, तर ठीक आहे, पण एका गोलंदाजाला तेव्हा खूप राग यायला हवा, जेव्हा एक चुकीची हिट बॉलला सिमारेषेच्या पार ढकलते. चॅपल यांच्या मते, ही अडचण ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानात जास्त नाही, पण ठाऊक नाही. कोणा हुशार व्यक्तीने बॅट व छोट्या मैदानाचे विचित्र संयोजन निर्माण केले. हे संयोजन गोलंदाजांना ‘व्हर्च्युअल बॉलिंग मशीन’ बनवते आहे. हा चांगल्या गोलंदाजांसाठी गंभीर मुद्दा आहे व त्यावर तातडीने तोडगा काढायला हवा. ते पुढे म्हणतात, गोलंदाजांना जाणुनबुजून नियमांद्वारे स्टम्पच्या बाहेर चेंडू फेकण्यासाठी उकसवले जाते, कारण मोठ्या शॉटपासून ते आपला बचाव करू शकतील, पण हिच गोष्ट खेळाचे महत्त्व कमी करते. ते म्हणतात, क्रिकेटमधून मनोरंजनाची गरज आहे, पण सोबतच त्याचे मूळ बळकट करणे गरजेचे आहे. प्रशासकांनी खेळातील भविष्य योजनेचा विचार करताना या महत्त्वाच्या मुद्यांचा विचार करणे गरजेचे आहे.