नवी दिल्ली – विश्व क्रमवारीत अव्वल स्थानी जागा मिळवण्यापासून ते ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्यापर्यंतच्या प्रवासात मागील ४ वर्षांत किदांबी श्रीकांतने अनेक चढ-उतार पाहिले. हेच कारण आहे की, या अनुभवी बॅडमिंटन खेळाडूने विश्व चॅम्पियनशीपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्यानंतर ही आपला जल्लोष साजरा केला नाही.
तसेच श्रीकांत हा काही पुनरागमनानंतर जल्लोष करणाऱ्या खेळाडूंपैकी नाही. त्याच्या जागी श्रीकांतने संयम दाखवला, ज्यामुळे फिटनेस व फॉर्मसारख्या समस्या असतानाही त्याने जागतिक व्यासपीठावर एक वेगळे उदाहरण सादर केले. या प्रतिष्ठीत स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचे हे पहिले रौप्य पदक ठरले, पण श्रीकांतने ‘स्वप्न पूर्ण झाल्यासारखे’ कोणतेच कारण दिले नाही. तो फक्त एवढेच म्हणाला की, मी यासाठी कठोर मेहनत घेतली व मला आनंद आहे की, मी आज येथे उभा आहे. मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपिचंद हे समझू शकतात की, २८ वर्षीय हा खेळाडू कोणकोणत्या गोष्टीतून गेला आहे. तसेच त्यांना आनंद आहे की, अनेक महिने अपयशाचा सामना केल्यानंतर ऑलिम्पिकसाठी पात्रता न मिळाल्याने खचलेला श्रीकांत येथील यशानंतर देखील भावनांच्या आहारी गेला नाही. गोपिचंद म्हणाले की, त्याने ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली, त्याने मी आनंदी आहे. तो आपली कारकिर्द संपल्यानंतर या विजयाचा जल्लोष करेल. आता वेळ आहे की, त्याने कामगिरीत सातत्य राखण्यासाठी लक्ष द्यावे. पुढील वर्षी अनेक मोठ्या स्पर्धा होतील व त्याआधी सकारात्मकता प्राप्त करणे चांगली गोष्ट असेल. स्पर्धेआधी श्रीकांतला व्हिसा समस्येचा सामना करावा लागला व त्याचे स्पर्धेत खेळणे देखील निश्चित नव्हते. अशात पदक जिंकणे तर विसराच.
श्रीकांतने दुखापतीतून सावरत ग्लास्कोमध्ये २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचला. त्यानंतर श्रीकांतचा वाईट काळ सुरू झाला. गुडघे व टाचेच्या दुखापतीमुळे त्याचा प्रभाव त्याच्या कामगिरीवर झाला. ऑलिम्पिक क्वालिफिकेशन डोळ्यासमोर ठेवत श्रीकांत दुखापतीतून सावरला नसतानाही कोर्टवर परतला. त्याचा हाच निर्णय चुकीचा ठरला. त्यामुळे त्याने अनेक स्पर्धा गमावल्या. अशात कोविड-१९ महामारीमुळे त्याला पूर्ण फिटनेस मिळवण्याची संधी तर मिळाली, पण तोपर्यंत अनेक ऑलिम्पिक क्वालिफायर रद्द झाल्याने टोकियो ऑलिम्पिक खेळण्याचे श्रीकांतचे स्वप्न भंगले. त्यानंतर ही तो आंतरराष्ट्रीय सामन्यात सपशेल अपयशी ठरत होता. श्रीकांतला नशीबाची साथ हवी होती. जी त्याला स्पेनमध्ये मिळाली, जेव्हा मोमोटा जोनाथन क्रिस्टी व अँथोनी गिनटिंग यांच्या माघारीनंतर तो आपल्या हाफमध्ये अग्रमानांकित खेळाडू म्हणून शिल्लक राहिला. श्रीकांतने त्याचा पूर्ण फायदा घेतला व रविवारी विश्व चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. पुढील वर्षी त्याचे खूप काही दावावर असेल व श्रीकांत आपल्या पुनरागमनाची गोष्ट आणखीन अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल. तो म्हणाला की, मी प्रयत्न करेन की, कठोर मेहनत कायम राखेण, हिच प्रक्रिया आहे. पुढील वर्षी आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, विश्व चॅम्पियनशीपसाख्या खूप स्पर्धा होणार आहेत. मोठे वर्ष, अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करेन व त्यावर काम सुरू आहे.
पंतप्रधानांकडून श्रीकांतला शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतवर सोमवारी कौतुकांचा वर्षाव केला. ते म्हणाले की, आमचा विजय खेळाडूंना प्रेरणा देईल. त्यांनी एक ट्विट केले, ज्यात ते म्हणतात, ऐतिहासिक रौप्य पदक जिंकण्याबाबत किदांबी श्रीकांतचे अभिनंदन. हा विजय अनेक खेळाडूंना प्रेरणा देईल व बॅडमिंटनबाबत त्यांची आवड वाढेल.