….म्हणून पहिल्या कसोटीत श्रीकर भरतने केले यष्टीरक्षण

कानपूर – अनुभवी यष्टीरक्षक व भारतीय संघातील सर्वात जास्त वय असलेला खेळाडू रिद्धीमान साहा मान लचकल्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानात यष्टीरक्षणासाठी उतरला नाही. त्याची जागा श्रीकर भरतने घेतली. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, रिद्धीमान साहाची मान काही कारणास्तव लचकली. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत आहे. त्याच्या अनुपस्थितीत श्रीकर भरत यष्टीरक्षण करेल. ३७ वर्षीय साहा नेहमीच मैदानात जखमी होत आला असून, फिटनेस समस्यांमुळे त्याला अनेक सामन्यांना मुकावे लागले आहे. या सामन्यासाठी रिषभ पंतला आराम दिल्यामुळे साहाला हा सामना खेळण्याची संधी मिळाली, पण पहिल्या डावात तो एकच धाव करू शकला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …