…म्हणून पक्षाला काही मोठे खिंडार पडले नाही; वसंत मोरेंची रुपाली ठोंबरेंवर खोचक टीका

पुणे – मनसेतील पक्षांतर्गत कलहातून प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे यांनी राजीनामा दिला. रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे, मनसेला त्यांच्या जाण्याने काही मोठे खिंडार पडले नाही, अशी बोचरी टीका मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याची टीका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केली होती; मात्र रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावे, असे आव्हानही वसंत मोरे यांनी केले.

रुपाली पाटील यांना राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री प्लॅन आहे. येत्या महापालिका निवडणुकात मनसेची ताकद दिसेल. पक्षांतर्गत वादाचा विषय मी स्वत: राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींसमोर मिटवला होता, असेही मोरे यांनी म्हटले. ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर नगरसेवक वसंत मोरे यांचे ट्विट ही चर्चेचा विषय ठरेल होते. मोरे यांनी ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत स्वत: व मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या सोबतचा फोटो शेअर करत ‘जब हम दो साथ खडे तो सबसे बडे, अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत’ असे कॅप्शन दिले होते. सद्यस्थितीला पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेच मनसेचे नगरसेवक आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …