ठळक बातम्या

…म्हणून आमचे भारतावरील पारडे जड – एल्गर

सेंच्युरियन – दक्षिण आफ्रिकेला या गोष्टीची पूर्णपणे जाणिव आहे की, भारताने नुकतेच परदेशात यश प्राप्त केले आहे. त्यांचा कर्णधार डीन एल्गरच्या मते, रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांची कसोटी मालिका स्थानिक मैदानात खेळणार असल्याने त्यांच्या संघाचे पारडे थोडे जड असेल. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच खेळपट्टीवर २-१ ने पराभव केला व जागतिक विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलचे तिकीट मिळवले, जिथे त्यांना न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. एवढेच नाही तर भारताने इंग्लंडमध्ये चार सामन्यांत २-१ अशी आघाडी मिळवली होती, पण पाचवा सामना कोविड-१९ मुळे त्यांना स्थगित करावा लागला. एल्गर सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्व संध्येला म्हणाला की, हा बरोबरीचा सामना असेल. आम्ही स्थानिक मैदानात खेळत आहोत, ज्यामुळे आमचे पारडे थोडे जड असेल. भारतीय संघ जगातील क्रमांक एकचा संघ आहे. आम्ही त्याकडे अशाप्रकारे पाहू शकत नाही. एका क्रिकेटप्रेमीच्या रूपात माझे निरीक्षण असे सांगते की, माझा संघ मागील काही वेळेपासून चांगली कामगिरी करत आहे. एल्गर पुढे म्हणतो, त्यांनी मागील काही महिन्यात जे काही केले, त्याचे श्रेय कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. त्यामुळे मी येथे हे सांगण्यास आलेलो नाही की, त्यांचा संघ जगात सर्वोत्कृष्ट नाही, कारण रँकिंग प्रणालीदेखील महत्त्वाची ठरते, पण हे सत्य ही नाकारता येत नाही की, आम्ही आमच्या मैदानात खेळत आहोत, जिथे मालिकेत खेळण्याची आधी आमची स्थिती चांगली असेल. भारताच्या यशात त्यांच्या वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची होती व एल्गरने मानले की, पाहुण्या संघातील वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेतील वेगवान व उसळी घेणाऱ्या खेळपट्टींचा फायदा उचलतील. तो म्हणाला, यावेळी त्यांची बळकट बाजू ही त्यांची गोलंदाजी आहे. आम्ही हे योग्यरित्या जाणतो. एका गोलंदाजी चमूच्या रूपात त्यांनी खूप यश संपादन केले. त्यांच्याकडे खूप अनुभवी गोलंदाज आहेत, ज्यांची साथ देण्यासाठी चांगले गोलंदाज आहेत. एल्गर म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेत सामना खेळत असल्याने मला पूर्ण विश्वास आहे की, आमचे गोलंदाजी आक्रमण परिस्थितींचा योग्यरित्या फायदा घेतील. भारत अद्यापपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेला नाही. विराट कोहलीचा संघ ते यश मिळवू पाहतो, त्याबाबत एल्गर म्हणाला की, आम्हाला त्यांच्या मागील यशाबाबत पूर्णपणे माहीत आहे. भारताने परदेशातील आपल्या रेकॉर्डमध्ये खूप सुधारणा केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …