पुणे – १०० कोटी वसुलीच्या आरोपामुळे पायउतार व्हावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात दाखल झाले. सोमवारी सकाळीच ते ईडी कार्यालयात पोहोचले. दरम्यान, त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधला.
अनिल देशमुख आता प्रकट झाले आहेत. ते आधी का आले नाहीत?, आता ईडी ठरवेल काय कारवाई करायची. आता जर ते ईडीसमोर आले नसते, तर त्यांना फरारी घोषित करण्यात आले असते. ते टाळण्यासाठीच ते सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले, मात्र त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असा टोला पाटील यांनी देशमुखांना लगावला.