मौनीने रद्द केले दुबई वेडींग


अभिनेत्री मौनी राय ही आपला ब्वॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्या सोबत जानेवारीमध्ये दुबईत डेस्टीनेशन वेडींग करणार होती. परंतु आता मौनी आणि सूरजने आपला प्लॅन बदलला आहे. आता हे दोघे विदेशात नाही तर भारतातच विवाहबद्ध होणार आहेत. दुबईऐवजी दिल्लीतच सात फेरे घेण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे. मौनीने आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलेच नाव कमावले आहे तर सूरज हा दुबई स्थित बॅँकर आणि बिझनेसमॅन आहे, जो बंगळूरुच्या जैन फॅमिलीतील आहे.
दोन महिन्यांपूर्वी मौनीचा कझन विद्युत रॉयसरकर याने मौनी आणि सूरजच्या विवाहाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्याने म्हटले होते की हा विवाह दुबई किंवा इटलीमध्ये पार पडेल कारण या दोघांना फंक्शन प्रायव्हेट ठेवायचे आहे. मौनी आणि सूरज 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जीचा आगामी चित्रपट ब्रम्हास्त्र मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसून येणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच ती दिल गलती कर बैठा है या म्युझिक व्हिडिओमध्ये सिंगर ज्युबिन नौटियालबरोबर दिसून आली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …