मोस्ट ॲडमायर्ड वुमन 2021 च्या यादीत प्रियांकाचा समावेश


देसी गर्ल प्रियांका चोप्राने आणखी एक यश संपादन केले आहे. मोस्ट ॲडमायर्ड वुमन 2021 च्या यादीत प्रियांकाने जागा पटकावली आहे प्रियांका व्यतिरिक्त या यादीत ॲँजेलिना जोली, स्कार्लेट जॉन्सन, एमा वॉटसन आणि टेलर स्विफ्ट यांच्याही नावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या यादीत प्रियांकाचे नाव 15 व्या क्रमांकावर होते. रिपोर्टनुसार या सर्व्हेमध्ये 38 देशांतील 42 हजार लोकांनी भाग घेतला आहे.
यंदाच्या यादीत मिशेल ओबामा या प्रथम क्रमांकावर तर ॲँजेलिना जोली दुसऱ्या व ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ 2 तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर प्रियांका चोप्रा ही दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. पाकिस्तानच्या मलाल युसुफजई ही नवव्या क्रमांकावर असून दोघींच्या रॅँकींगमध्ये 5 -5 क्रमांकांनी वाढ झाली आहे.
प्रियांका चोप्रा सध्या आपला नवा शो सिटाडेलच्या शूटींगमध्ये बिझी आहे तर लवकरच तिचा आगामी चित्रपट द मॅट्रीक्स रेसुरेक्शन प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …