औरंगाबाद – मोटारसायकलवरून सुसाट वेगाने येत पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावणाऱ्या बंटी व बबलीवर औरंगाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. वेदांत नगर येथे पोलिसांनी या जोडगोळीला रंगेहात पकडण्यात यश मिळवले. ऋषिकेश रोडे व मानसी रोडे असे या जोडीचे नाव असून, मेहनत करून पैसा कमावण्याचा कंटाळा आल्याने दोघांनी गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवल्याची माहिती चौकशीअंती पोलिसांना मिळाली. मागील २ महिन्यांत शहरात अनेक ठिकाणी पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याच्या घटनांचे सत्र सुरू होते. त्यात वेदांत नगर, क्रांती चौकातील निर्मनुष्य, उच्चभ्रू वसाहतीत वारंवार घटना उघडकीस येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशात, खासगी वाहनांतून गस्त सुरू केली. ६ डिसेंबर रोजी १० वाजता नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना पोलिसांना राममंदिर परिसरातून आरडाओरडा ऐकू आला. यावेळी कन्नडवरून आलेल्या सुदर्शन दत्तात्रय गायके यांचा मोबाइल हिसकावला होता. पथकाने तात्काळ चोरांचा पाठलाग सुरू केला आणि देवगिरी महाविद्यालयाजवळ त्यांना रंगेहात पकडले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …