मोदी सरकारच्या ‘त्या’ चुकांचा फटका देशाला भोगावा लागला – सोनिया गांधींचे टीकास्त्र

नवी दिल्ली – भारताने नुकताच १०० कोटी कोरोना लसींचा टप्पा पार केला. त्यामुळे केंद्र सरकारवर जगभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. असे असले, तरी विरोधी पक्षानं मात्र दुसऱ्या लाटेचं खापर मोदी सरकारवर फोडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकारने गंभीर चुका केल्याचा फटका देशाला भोगावा लागल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. एका हिंदी दैनिकात त्यांनी लिहिलेल्या ‘हम कैसे भूल जाएंगे वो दौर’ या लेखामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे, तसेच कोरोना काळात झालेल्या जीवितहानीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरले आहे.

सोनिया गांधी यांनी आपल्या लेखामध्ये कोरोना काळात देशभर आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केले; मात्र त्याचसोबत त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे. मोदी सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दाखवलेल्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने अवलंबलेले धोरण दु:खद आणि दुर्दैवी आहे. देशात जेव्हा कोरोनाची दुसरी लाट सर्वोच्च बिंदूवर होती, तेव्हा मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सातत्याने लोकांचे जीव जात होते. त्यामुळे इतक्या वेळा इशारा देऊन देखील एखादं सरकार इतकं निष्क्रिय कसं राहू शकतं हे समजण्याच्या पलीकडचं आहे, असे सोनिया गांधी म्हणतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …