मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता यांचे निधन

पुणे – येथील मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता यांचे बुधवारी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. मेहता यांच्यावर मागील काही दिवस पुना हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हळूहळू अवयव निकामी होत गेल्याने त्यांचे निधन झाले.

गेल्या १५ दिवसांपासून मेहता हे पुण्यातल्या पुना हॉस्पिटलमध्ये एका आजारावर उपचार घेत होते. मात्र या आजारामुळे अवयव निकामी होत असल्याने त्यांना दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी ४ वाजता अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सीईओ आणि एमडी, सुनील अनिल मेहता यांनी १९८६ मध्ये त्यांचे वडील अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी अगदी लहान वयापासून मेहता पब्लिशिंग हाऊसचा पाया आणि वाढ पाहिली व काम शिकून घेतले, तसेच वडिलांकडून व्यवसायाची दोरी आपल्या हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची ताकद वाढली. मराठीत परदेशी आणि प्रादेशिक पुस्तकांचे भाषांतर आणि प्रकाशन करण्यास त्यांनी सुरुवात केली. मराठीतील पहिली ई-बुक सेवा देण्याचे कार्य सुनील मेहता यांनीच सुरू केले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …