ठळक बातम्या

मेरे संय्याजीसे आज मैने बे्रकअप कर लिया…

अर्जुन कपूर आणि मलाईका अरोरा यांच्यातील नातेसंबंध ही काही आता लपून राहिलेली गोष्ट नाही. या दोघांनी भलेही स्पष्टपणे आपल्या प्रेमाची कबुली जगासमोर दिलेली नाही, परंतु सोशल मीडियासारख्या माध्यमांचा आधार घेत हे दोघेही परस्परांवरचे प्रेम व्यक्त करताना अनेकदा दिसून आलेत. त्यांच्या या नात्यावर अनेकांनी बोट ठेवले, तर काहींनी या जोडीला पसंतीही दर्शवली, परंतु त्यांच्याकरिता आता एक वाईट खबर आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अर्जुन आणि मलाईका यांच्यात चांगलेच वाजले असून, त्यामुळे मलाईका ही अर्जुनवर सध्या खूप नाराज आहे.

महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर चित्रपटांच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे. अनेक महिन्यांपासून धिम्या गतीने सुरू असलेली कामे जोरात सुरू झाली आहेत. अर्जुन कपूरनेही अलीकडेच मोहीत सुरीच्या एक व्हिलन रिटर्न्सचे शूटिंग आटोपले आहे. त्यानंतरही अर्जुन हा काही मोकळा झालेला नाही. तो आपल्या अनेक आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ज्यामुळे तो यावेळचा ख्रिसमस तसेच नववर्षाच्या सेलिब्रेशनवेळीही खूप व्यस्त राहणार आहे. त्यामुळे त्याला नवीन वर्षाचे स्वागत करता येणार नाही. गेल्या दिवाळीला अर्जुन आणि मलाईकाने खूप एंजॉय केले होते व हा सण एकत्र साजराही केला होता. यावेळेसही ख्रिसमस आणि न्यू ईअर अर्जुनबरोबर साजरा करण्याची स्वप्ने मलाईका पाहत असतानाच अर्जुनने आपल्या बिझी शेड्यूलमुळे असे सेलिब्रेशन करण्यास नकार दिला आहे. आता अर्जुनने नकार दिल्यावर मलाईका भडकली, तर नवल ते काय? अर्जुनच्या या नकारघंटेमुळे मलाईका त्याच्यावर सध्या कमालीची नाराज आहे. आता त्यांच्यात ब्रेकअप तर झाला नाही ना असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना सतावत आहे. आता ही नाराजी दूर होतेय की, एक सो कॉल्ड नाते अधिकृत होण्याआधीच संपुष्टात येतेय, ते येत्या काही दिवसांत कळेलच!

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …