मॅक्सवेलने ‘या’ दोघांना दिले यशाचे श्रेय

दुबई – ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने आपल्या यशाचे श्रेय आयपीएलमधील आपले सहकारी विराट कोहली व एबी डिव्हिलियर्सला दिले व म्हटले की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)साठी खेळताना या दोघांसोबत वेळ घालवण्याचा मला खूप फायदा मिळाला.

मॅक्सवेल म्हणाला की, विराट व डिव्हिलियर्ससोबत वेळ घालवणे, खेळणे व सराव करताना मला असे वाटले की, माझी उंची खूप वाढली आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मॅक्सवेल म्हणतो की, प्रत्येक दिवशी काही ना काही शिकायला मिळायचे. मी विराट व डिव्हिलियर्सला पाहत काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करायचो. तो पुढे म्हणाला, आयपीएलसाठी मी एका गोष्टीसाठी नेहमीच आभारी राहिन की, ते मला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून देतात. माझं नशीब होते की, खेळातील दोन दिग्गज माझ्या संघात होते व ते आपला अनुभव व खेळाबाबत चर्चा करण्यास नेहमीच तयार असतात. जेव्हा आपणास त्यांची मदत मिळते, ते आपणास खेळताना पाहतात वा आपणास प्रश्न विचारतात, तेव्हा आपली उंची वाढते. त्याने आत्मविश्वास वाढतो. त्याने आनंद मिळतो. तेथील वातावरण खूपच हलकं-फुलकं असते. मॅक्सवेलने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली. टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी त्याचा फॉर्म महत्त्वाचा ठरेल. तो म्हणाला, जर मी आयपीएलमधील आपला फॉर्म कायम ठेवतो, तर मला माहीत आहे की, मला नक्कीच यश मिळेल. मी चांगल्या फॉर्मात आहे व मानसिक रूपात चांगली स्थिती आहे. मी खेळाबाबत जास्त विचार करत नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *