ठळक बातम्या

मूल होत नाही, म्हणून भाचीचे अपहरण

  • मावशीसह नवऱ्यालाही अटक

उल्हासनगर – आपल्याला मूल होत नसल्यामुळे एका सख्ख्या मावशीनेच आपल्या भाचीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हानसनगर शहरात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सहा वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरणप्रकरणी आरोपी मावशी आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी चिमुकलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले, तेव्हा लेकीला सुखरूप पाहून पालकांना अश्रू अनावर झाले. उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीनमध्ये संबंधित कुटुंब राहते. त्यांच्या ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण शाखा करत होते. यावेळी रिक्षात बसलेल्या महिला-पुरुषाच्या जोडगोळीने मुलीला नेल्याची माहिती पोलिसांना समजली. तपासाच्या आधारे अंबरनाथ डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या गणेश मुदलियार आणि त्याची पत्नी सरला मुदलियार यांची पोलिसांनी धरपकड केली. मुदलियार दाम्पत्याच्या घरातून सहा वर्षांच्या चिमुरडीची सुखरूप सुटका करण्यात आली. मूल होत नसल्याने सरलाने बहिणीच्या मुलीला पळवल्याचे तपासात समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला. भाचीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी मावशी आणि तिचा पती अशा दोघांनाही अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …