मुस्लीम वर्गाला कोरोना व्हॅक्सीन घेण्यासाठी प्रेरित करणार सलमान

देशभरातील कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी सर्व राज्य सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करताना दिसून येत आहे. या महामारीविरोधात लढण्यासाठी देश तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये सातत्याने लसीकरण सुरू आहे, तर आता मुस्लीम बहुल परिसरात कोरोना व्हॅक्सीनसाठी लोकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने एक अनोखी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता सरकारने बॉलीवूड अभिनेता सलमान खानची मदत मागितली आहे.

एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र सरकार मुस्लीम बहुल परिसरातील लोकांनी कोरोना लसीकरण करावे, याकरिता सलमान खानची मदत घेणार आहे, जेणेकरून सलमान या लोकांना व्हॅक्सीन घेण्यासाठी प्रेरित करेल. ही माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांचे मानणे आहे की, राज्यातील काही मुस्लीम बहुल परिसरात अनेक लोक व्हॅक्सीन घेण्यासाठी घाबरत आहेत व चिंतेत आहेत. या लोकांना व्हॅक्सीन घेण्यासाठी सलमान प्रेरित करेल. राजेश टोपे म्हणाले, ‘मुस्लीम बहुल परिसरात अद्यापही कोरोना व्हॅक्सीनविषयी संभ्रम आहे. आम्ही मुस्लीम समाजाला व्हॅक्सीनकरिता प्रेरित करण्यासाठी सलमान खान आणि धर्मगुरूंची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजेश टोपे पुढे म्हणाले की, धार्मिक नेते आणि चित्रपट अभिनेत्यांचा प्रचंड प्रभाव असतो आणि लोक त्यांचे म्हणणे मानतात.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …