मुश्ताक अली चषक धोक्यात? मुंबईच्या ४ खेळाडंूना कोविडची लागण

मुंबई – सैयद मुश्ताक अली चषकासाठी मुंबईच्या संघात समाविष्ट ४ खेळाडूंचे अहवाल कोविड-१९मध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या स्थानी नव्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

विश्वसनीय सूत्रांनी गोपनियतेच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, सीनियर संघातील ४ खेळाडू पॉझिटिव्ह आढळलेत. या खेळाडूंत शम्स मुलानी, साईराज पाटील, प्रशांत सोळंकी व सरफराज खान यांचा समावेश आहे. असे देखील कळते की, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने चार ही स्थानी नव्या खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांच्या नावाची लकरच घोषणा होईल. सूत्र म्हणाले की, आम्ही चार नव्या खेळाडूंची रॅपिड आरटी-पीसीआर चाचणी करणार आहोत. त्यांच्या अहवालानंतर त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. तसेच आम्ही संघातील इतर सदस्यांची ही आरटी-पीसीआर चाचणी करत आहोत. मुंबईला ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ब गटात ठेवण्यात आले आहे. ते आपला पहिला लीग सामना गुवाहाटीमध्ये खेळतील. त्यांचा पहिला सामना कर्नाटकशी होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …