लहान मुले असोत वा वृद्ध, सर्वांनाच चित्रपट पाहायला आवडतात. चित्रपट हा प्रौढांसाठी वेळ घालवण्याचा आणि मुलांसाठी एक अनोखा अनुभव आहे; पण तुम्ही कधी ऐकले आहे का की, एखाद्याला चित्रपट पाहण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले आहे?, नुकतेच उत्तर कोरियामध्ये असेच काहीसे घडले. एका १४ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याने फक्त ५ मिनिटे चित्रपट पाहिला, त्यानंतर त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम-जोंग आणि तेथील सरकार त्यांच्या विचित्र वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. उत्तर कोरियाचे लोक अनेक प्रकारच्या बंधनात राहतात, ज्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. तेथील सरकार आणि त्यांनी बनवलेले नियम तालिबानपेक्षा कमी नाहीत. याचे जीवंत उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. एका १४ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याने दक्षिण कोरियाच्या चित्रपटातील एक छोटासा दृश्य पाहिला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
येथील वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार, ७ नोव्हेंबर रोजी एका १४ वर्षांच्या मुलाला उत्तर कोरियामध्ये अटक करण्यात आली, कारण त्याने दक्षिण कोरियाचा चित्रपट ‘द अंकल’चा एक सीन फक्त ५ मिनिटे पाहिला होता. हा किम ह्योंग-जिन दिग्दर्शित ‘मिस्ट्री ड्रामा’ चित्रपट आहे. रिपोर्टनुसार, हे मूल हायसेन शहरातील एलिमेंटरी आणि मिडल स्कूलचा विद्यार्थी होता. मुलाने फक्त ५ मिनिटे चित्रपट पाहिला होता, त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि त्याला १४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
देशाच्या असोसिएशन पद्धतीनुसार मुलाच्या पालकांना अटक केली जाऊ शकते, असे मानले जाते. या प्रणालीअंतर्गत बेजबाबदार शिक्षणामुळे देशात संस्कृतीशी संबंधित कोणताही गुन्हा घडल्यास अशा शिक्षणासाठी जबाबदार असणाºयांना १६ हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो, जो तेथील लोकांच्या मते मोठी रक्कम आहे. याचे कारण म्हणजे जनतेचे उत्पन्न आणि पगार खूपच कमी आहे. इतकेच नाही, तर यापूर्वी अश्लील व्हिडीओ पाहणाºया मुलाच्या पालकांसोबतही असाच प्रकार करण्यात आल्याने पालकांना राजकीय शिबिरात पाठवावे, असेही मानले जात आहे.